बारामती: ऑल इंडिया संपादक संघाच्या वतीने बारामती शहर पोलीस ठाण्याचे विद्यमान नूतन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांची सदिंच्छा भेट घेत समन्वय चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस निरिक्षक संतोष घोळवे यांना जगदिश ओव्हळ लिखीत जग बदलणारा बापमाणूस पुस्तक भेट देवून शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे,पुणे जिल्हाध्यक्ष भारत तुपे,शहरध्यक्ष प्रतिक चव्हाण,बारामती तालुकाध्यक्ष दशरथ मांढरे,संतोष पांढरे,दया दामोदरे,कायदेशीर सल्लागार अँड.वैभव शेलार उपस्थित होते.






