बारामती (दि :२७)
मेहतर वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत वीर गोगादेव यांचा जन्मोत्सव, बारामती सार्वजनिक गोगादेव जन्मोत्सव समितीच्या वतीने (दि:२५) रोजी साजरा करण्यात आला. वीर गोगादेव यांचा जन्मोत्सव दरम्यान भव्य मिनी बागड चे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक कुंदन लालबिगे यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनोज भगत निशान आखाड्याचे भगत मनोज लालबिगे, भगवान वीर गोगादेव निशान आखाड्याचे भगत प्रदीप लालबिगे, वीर रतनसिंग वाल्मिकी (गोगाधारी) निशान आखाड्याचे भगत विशाल वाल्मिकी या तीन निशाणांची महाआरती बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब चव्हाण पाटील, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा अनिताताई गायकवाड, पत्रकार तैनुर शेख, पत्रकार सुरज देवकाते, पत्रकार विराज शिंदे, राकेश वाल्मिकी, आदित्य हिंगणे, अक्षय कांबळे, दाऊद शेख, संदीप पवार, जमीर इनामदार, अमोल शिंदे, दशरथ धोत्रे, भीमराव चौगुले, सुरज अहिवळे उपस्थित होते..
निशान आखाड्याची भव्य मिरवणूक उघडा मारुती मंदिर पासून भिगवन चौक, गांधी चौक, तांदुळवाडी वेस चौक, लालबिगे चौकापर्यंत काढण्यात आली या नंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.






