बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मधील विकास कामांची पाहणी केली परंतु दलीत वस्तीत सुरू असलेल्या कामांची पाहणी त्यांनी केली नाही.दलीत वस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे?अनेक कामे दलीत वस्तीत सुरू आहेत.काही पूर्ण झाली आहेत त्याचे उद्घाटन झाले आहे.या विकास कामांचा नागरिकांना वापर करता येत आहे का? याची चौकशी सुद्धा यावेळी केली जात नाही.दलीत वस्तीत येऊन प्रचार केला जातो परंतु मतदान झाल्यावर या वस्त्यांकडे येऊ वाटत नाही का? भारतीय युवा पँथर संघटनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.तरी देखील दलीत वस्तीत सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी का केली जात नाही?
सिद्धार्थ नगर आमराई येथील माता रमाई अभ्यासिका उद्घाटन खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले यावेळी विकास कामाच्या बाजूच्या चार पथदिव्याच्या खांबाला रंग देण्यात आला.इतर वेळी पथदिवे दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना वारंवार तक्रार करावी लागते. आमराईत केलेले रस्ते आणि इतर ठिकाणी केलेले रस्ते यामध्ये भरपूर फरक आहे.कामाचा दर्जा निकृष्ट आहे .जाणूनबुजून याठिकाणी अशी कामे केली जात आहेत का? नाले सफाई अजून झालेली नाही.मागील वेळेस अनंत नगर येथे स्वच्छता अभियान झाले त्यावेळेस मोकळ्या प्लॉट मध्ये मुरूम टाकून त्याठिकाणी कचरा गोळा करण्यात आला.त्याच अनंत नगर मध्ये सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था आहे.परिसरात अस्वच्छता आहे.याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.म्हणून लोकसभेला याठिकाणी असलेल्या बूथ चे मतदान बघितल्यानंतर लक्षात येईल की नागरिकांनी विरोध मतदान करून दर्शविला.त्यामुळे येत्या विधानसभेला देखील नागरिक मतदान करताना विचार नक्कीच करतील.असे नागरिकांमधून बोलले जात आहे.बारामती मधील दलीत वस्तीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत उद्घाटन होऊन बरेच दिवस झाले तरी लोकांना हक्काचे घर मिळाले नाही.अनेक प्रश्न दलीत वस्तीत प्रलंबित आहेत लवकरच महाराष्ट्राचे नेतृत्वाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहे.आणि सुशोभीकरण करून काही उपयोग नाही जनतेचे प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी -
‘हर-घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे बारामती नप चे नागरिकांना आवाहन




