बारामती-कोरोना काळ व त्यानंतर उद्भवलेल्या आर्थिक मंदी मुळे मागील तीन वर्षात संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प असल्याने प्रामुख्याने गोरगरीब, हातावरचे पोट असणारे, छोटे उद्योजक व्यवसायिक व मागासवर्गीय लोकांची आर्थिक कुचुंबना झाले असल्याने संबंधितांना केवळ जगणे दुरापास्त होत असल्याने अनेक प्रकारचे कर व मालमत्ता कर भरणे शक्य होणार नाही. याकरता कोरोना काळातील थकीत मालमत्ता कर बारामती नगरपालिका प्रशासनाने किमान 50 टक्के माफ करावा व चालू वर्षाची घरपट्टी तेवढी घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिय पुणे जिल्हा सचिव श्री सुनील शिंदे यांनी निवेदनाद्वारे बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे केली आहे.
कोरोना नंतरच्या काळात विस्कटलेली आर्थिक घडी बसविताना नागरिकांच्या नाकी नऊ येऊ लागले असताना शासन नगरपालिका प्रशासन थकित मालमत्ता करा संदर्भात काहीतरी दिलासादायक निर्णय घेऊ शकते या आशेवर अनेक नागरिक असल्याकारणाने बहुतेकांनी मालमत्ता कर भरलेले नसल्याने जवळजवळ 30-35 कोटी रुपये नगरपालिकेला मालमत्ता कर थकीत राहिला आहे व यामुळे नगरपालिका प्रशासनाची अडचण होऊ शकते त्याच करता घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता थकित करांमध्ये घसघशीत सूट जाहीर करावी व त्याबरोबर चालू घरपट्टी भरून घ्यावी तसेच शासन परवानगी नसलेल्या घरांच्या संदर्भात आवास्तव शास्ती कर माफ करावा, पाच वर्षांपूर्वी पर्यंतच्या परवानगी नसलेली घर बांधकामे नियमित करावीत, थकित घरपट्टीवर आकारलेले व्याज रद्द करावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे, शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, जिल्हा महिला अध्यक्षा रत्नप्रभा साबळे, तालुका सरचिटणीस माऊली कांबळे, संपर्कप्रमुख निलेश जाधव, शहर उपाध्यक्ष रामहरी बल्लाळ, गणेश जाधव, राजेंद्र लांडगेआदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी नागरिकांना द्यावी लागते चिठ्ठी आणि नगरसेवकांना मिळते थेट एन्ट्री
-
बारामती मध्ये मंत्रोच्चारसह सलग १२ तास अखंड सूर्यनमस्काराचा विक्रम संपन्न : बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्य अजिंक्य साळी यांचा विक्रम