बारामती: बारामती तालुक्यातील नागरिक प्रशासकीय भवन येथे शासकीय कामासाठी येत असतात.त्यामध्ये काही वृद्ध,अपंग लोकसुद्धा येतात त्यांना कामानिमित्त तिसऱ्या दुसऱ्या मजल्यावर जायचे असल्यास जिना चढून जावे लागत आहे.
शासकीय निधी खर्च करून एवढी मोठी इमारत बांधून देखील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
उपविभागीय आधिकारी यांचे कार्यालयात जायचे असेल तरी जिना/ पायऱ्या चढून जावे लागते.अभिलेख कक्ष/ रेकॉर्ड रूम देखील तिसऱ्या मजल्यावर आहे नागरिकांना जमिनी संदर्भात कागदपत्र हवी असल्यास पायऱ्या चढून जावे लागत आहे.सामान्य नागरिक हा त्रास सहन करून आपल्या काम करून घेत आहे.परंतु अपंग,वृद्ध लोकांसाठी तरी प्रशासकीय इमारतीचा लिफ्ट चालू केली पाहिजे असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. लवकरात लवकर लिफ्ट चालू करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
-
इयत्ता १० वी मध्ये ९२.८०% गुण संपादन केल्यामुळे शालेय समिती व शिक्षकांनी निखिल शेंडगेचा घरी जाऊन केला सत्कार -
उद्यमिता यात्रेचा पुण्यात समारोप




