बारामती : बारामती किती ही विकसित म्हंटले तरी आज देखील काही प्रश्न नागरिकांना त्यांच्या अडचणी प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते.
बारामती शहरातील दलित वस्त्या, अल्पसंख्यांक वस्ती,याठिकाणी पाहणी केली तर विकास हा वेगळा असतो याचे उदाहरण पाहायला मिळेल.रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरण करण्याअगोदर नागरिकांचे प्रश्न सोडविले पाहिजे होते. वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाकडे सत्ता असून सुधा आजदेखील झोपडपट्ट्या आहे तशाच परिस्थितीत आहेत.या लोकांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना घरकुल योजनेतून निधी दिला असता तर आज या लोकांचे स्वतःचे घर असते.भविष्यात अतिक्रमण धारकांना अतिक्रमण नियमित करण्यासाठी संघर्ष करावा लागणार असे चित्र समोर दिसत आहे.
सार्वजनिक शौचालयासाठी विकसित बारामतीत नागरिकांना आंदोलन करावे लागते. पिण्याचे पाण्यासाठी आंदोलन करावे लागते. रस्ते, ड्रेनेज लाईन दुरुस्ती व रस्ता दुरुस्ती,नवीन पथदिवे बसविणे दुरुस्ती करणे यासाठी सुद्धा नागरिकांना स्वतःच पाठपुरावा करावा लागतो.
मोठ्या इमारती बांधणे म्हणजे विकास झाला असे म्हणायचे का? शासकीय हॉस्पिटल मध्ये जी औषधी उपलब्ध नाहीत नागरिकांना बाहेरून घ्यावी लागतात याची नोंद ठेऊन त्या उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.बारामतीत शासकीय कार्यालयाच्या इमारती मोठ्या आहेत.त्या इमारतीची स्वच्छता करण्यासाठी व्यवस्था नाही.इमारती बांधून विकास झाला परंतु या विकासाचा नागरिकांना फायदा होतो का याची पडताळणी कोण करणार?
बारामती शहरातील नदीच्या कडेला असलेल्या दलित वस्त्या पण विकसित बारामती दाखविताना दाखवणे गरजेचे आहे.त्यानंतर विकास किती झाला हे समजेल.नदीचे, रस्त्याचे सुशोभीकरण करणे म्हणजे विकास म्हणायचं का असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
निवडणुकीचा प्रचार करताना दिसणारे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कधी दिसत नाहीत.असे नागरिकांमधून बोलले जात आहे.






