
दौंड : बामसेफ एवं युनिट ऑफ मुलनिवासी बहुजन समाज दौंड तालुका युनिट यांनी एक दिवसीय जिल्हा स्तरीय प्रशिक्षण शिबीराचे दि. 7/8/2022 या दिवशी केडगांव चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केले होते. प्रशिक्षणाचे प्रमुख उद्घाटक म्हणून श्रीमंत झुरुंगे साहेब लोणीकंद पुणे हे होते. प्रशिक्षणाचे मार्गदर्शन मा. बलभीम माथेल सर ( प्रदेश अध्यक्ष बामसेफ एवं युनिट ऑफ मुलनिवासी बहुजन समाज महाराष्ट्र राज्य) हे होते. या शिबीराला मार्गदर्शन करताना मा. माथेले सरांनी महापुरुषांनी समाजासाठी पुकारलेला लढा विस्तृत स्वरुपात कार्यकर्त्या समोर मांडला. बुध्दांची करुणा मैञीभाव तसेच पंचशिलाचे पालन का करावे हे सांगितले. सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य यांनी बुध्द धम्माचा केलेला प्रचार प्रसार सांगितला. मंडल आयोग/ कालेलकर आयोग काय होता. त्यात भारतातील समस्त स्ञी वर्गाला त्या आयोगाने मागासवर्गीय मध्ये टाकले होते. नंतर त्या आयोगाचे काय झाले हे ही विस्तृत पणे सांगितले.भारत सरकार ओबीसी ची जातीनिहाय जणगणनना का करत नाही यावर पण त्यांनी प्रकाश टाकला. विश्वरत्न महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी ओबीसींच्या आरक्षणासाठी कायदेमंञी पदाचा राजीनामा दिला हे ही सांगितले .मंडल आयोग नेमका काय होता? मंडल आयोग लागू झाल्यानंतर त्यात क्रेमीलिअरची अट कशा पध्दतीने आली? या बाबत ही सविस्तर मांडणी केली .आज पर्यत जे जे आयोग सर्वार्थाने विकास करण्यासाठी नेमल्या गेले तर नेमक्या किती आयोगाची अमलबजावणी करण्यात आली? हा प्रश्न ही उपस्थित करण्यात आला .आज आपण बहुजन समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकानी एकत्र येवून महापूरूषांच्या जोडणार्या जीवन समृध्द करणार्या विचारधारेचा प्रचार प्रसार करणे काळाची गरज आहे .देशपातळीवर विविध सामाजीक संघटनेतील पदाधीकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येवून आजच्या स्थीतीत वैचारीक बैठका घेण्याची गरज आहे .लोकशाहीचा प्रतीनीधीत्व हा आत्मा आहे .मग आमचे प्रतीनीधीत्व हे जनगणना केल्याशिवाय त्या प्रमाणात कसे देता येईल हा ही प्रश्न आपल्या समोर आहे .या साठी चिंतन करून एकत्र येण्याचा निर्णय घेणे ही आजची गरज आहे .प्रशिक्षण शिबीर हे सामाजीक कार्य करणारासाठी आवश्यक आहे .या पूढे सातत्याने असे प्रशिक्षण वर्ग राज्यभरात घेतले जाणार आहेत असे प्रतिपादन माथेले यांनी केले . हया कार्यक्रमाचे आयोजन दौंड तालुका बामसेफ एवं युनिटी ऑफ मूलनिवासी बहुजन समाज यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 85% बहुजन समाजाला प्रतिनिधित्व देताना कोणाचा किती वाटा यावर अनेक प्रश्न सरांनी उपस्थित केले. . पुढे बोलताना ते म्हणाले 85%बहुजन समाजाला जागृत व एकजूट करण्याचा संकल्प बामसेफ एवं युनिटी ऑफ मूलनिवासी बहुजन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. कुमार काळे सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर तसेच राज्यात राबविण्यात येत असून बहुजन समाजात जनजागृती चे आभियान सुरू असल्याचे सांगितले. ओबीसी ची जातिनिहाय जणगनना करण्यात यावी ही देखील मागणी त्यांनी या ठिकाणी केले. बामसेफ एवं युनिटी ऑफ मूलनिवासी बहुजन समाज याच्या वतीने मा. एन. जी. गायकवाड यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी तर मा. गौतम चव्हाण यांची पुणे जिल्हा प्रभारी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी दौंड तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी नंदु गायकवाड निलेश बनकर डॉ. दत्ताञय जगताप नवले सर मा. गौतम चव्हाण सर अमोल भोपाळ मा. गोरख फुलारी सर डॉ. प्रशांत साळवे सर मा. काळे मॅडम वृषाली साळवे मॅडम पुष्पाराणी बनकर मॅडम पुजा मिसाळ आडागळे मॅडम भोपाळ मॅडम आशा चव्हाण मॅडम लखन जाधव सर सागर माळी विठ्ठल साळवे सर इ. कार्यकर्ते उपस्थित होते.






