बारामती तालुक्यातील अंजनगाव मधील वाळूमाफियांवर कधी होणार कारवाई?


बारामती : बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे वाळू उपसा चालू आहे.नदी पात्रात मोठ मोठे खड्डे या वाळूमाफियांनी केले आहेत.दिनांक १०/०२/२०२२ रोजी मा.तहसीलदार बारामती यांनी मंडल आधिकारी लोणी भापकर यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.तरी देखील अद्याप पर्यंत कारवाई केलेली नाही.

तसेच वाळू उपसा करून वाळू अवैधरीत्या वाहतूक करून विक्री केली जात आहे.या वाळूमाफियांवर कारवाईचे आदेश असताना देखील वाळू उपसा करीत आहे.वाळू माफियांवर कारवाई कधी होणार याबाबत चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची चोरी होत आहे. तरी बारामती महसूल प्रशासन याकडे का दुर्लक्ष करीत आहे? वाळू उपसा करणार्‍यांवर कडक कारवाई करावी.अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page