बारामती :बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग भेट दौरा सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार सदर दौरा आयोजित केल्याचे सोशल मीडिया मधून फिरत असलेल्या मेसेज मधून दिसत आहे.
काही भागात हा दौरा पूर्ण झाला आहे.तर काही ठिकाणी होणार आहे.या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.या दौऱ्यातून नागरिकांना बारामतीमधील विकास कामांची माहिती दिली जाणार आहे तसेच नागरिकांच्या अडीअडचणी समजून त्याचे निरसन केले जाणार आहे.त्यामुळे लोकांचे प्रश्न तात्काळ सुटतील जेणेकरून पुढील जनता दरबार मध्ये नागरिकांना जावे लागणार नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामतीत आल्यानंतर फक्त उपस्थित असणारे नेते प्रभाग दौऱ्यात वेळ देणार आहेत यामुळे नागरिकांमध्ये या दौऱ्याची चर्चा आहे.सदर दौरा सोशल मीडिया मधून लाईव्ह दाखविण्यात आला पाहिजे जेणेकरून इतर लोकांना देखील बारामतीच्या विकास कामांची माहिती मिळेल. तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकांच्या अडचणी सोडविताना करीत असलेले काम लोकांमध्ये पोहोचेल.आणि नागरिक या दौऱ्यात सहभागी होतील.अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.