बारामती : आज बारामती शहर व तालुका मांग गारुडी समाजाच्या वतीने, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन शेठ सातव बारामती नगरीच्या माजी नगराध्यक्ष सौ पौर्णिमा ताई तावरे बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इम्तियाजभाई शिकीलकर, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची स्वीय सहाय्यक हनुमंतराव पाटील , मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मामा खंडाळे माजी नगरसेवक अभिजीत चव्हाण , माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, माजी नगरसेवक गणेश भाईजी सोनवणे माजी नगरसेवक आप्पासाहेब अहिवळे सामाजिक कार्यकर्ते नितीन दादा शेलार, सामाजिक कार्यकर्ते उत्तम धोत्रे पत्रकार संघाचे अध्यक्ष तैनुर भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सचिन काकडे भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक इत्यादी मान्यवर हजर होते.
विशाल जाधव, तैनूर शेख, पोर्णिमा तावरे, यांनी यावेळेस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मांग गारुडी समाजातील तानाजी पाथरकर गजानन गायकवाड ,सचिन सकट, बापू पाथरकर, राजू खलसे, गोरख गायकवाड,यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.