बारामती ( वार्ताहर ) माणसाने ठरविले तर, माणसासाठी माणूस म्हणून, माणूसच धावून जावू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव बारामतीत पाहायला मिळाला. एका अनोळखी रुग्णासाठी संतोष जगताप नावाचा माणूस धावून आला आणि एका रुग्णाचा जीव वाचला.
येथील गिरीराज हॉस्पिटल बारामती येथे दत्तात्रय चतुर्भुज पाटील मौजे वरवडे तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर यांची बायपासची शस्त्रक्रिया तात्काळ करायची होती. मात्र त्यांना, रुग्णालयाने 8 रक्तपिशव्या तयार करण्यास सांगितल्या, रुग्णाचा मुलगा भाऊ पाटील हा तेथेच असलेल्या गिरीजा ब्लड बँकेत गेला, मात्र तेथे, गेल्यावर तुम्हाला 8 रक्तबाटल्या तयार करण्यास सांगितले आहे, त्यासाठी तुम्हाला 4 रक्तदाते आणावे लागतील.रुग्ण दवाखान्यात आणि मुलगा अनोख्या शहरात रक्तदाते कोठून मिळणार, त्यातच त्याची आणि स्थानिक कार्यकर्ता सिद्धार्थ आहीवळे याची गाठ पडली आणि भाऊ याने डोनरची गरज असल्याचे सिद्धार्थला बोलून दाखवले त्यानंतर सिद्धार्थने सामजिक कार्यकर्ते संतोष जगताप यांना रक्तदानासाठी विचारल्यानंतर ते व त्यांचे मित्र बंटी डीकळे,सुदाम लांडगे, सोमनाथ कदम व शिवा तुपे यांनी गिरीजा ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केले.
-
जादूटोणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन -
शासकीय कार्यालयांतील भोजनाची वेळ निश्चित करणेबाबत शासनाचे आदेश




