वंचित बहुजन युवा आघाडीची इंदापूर शहरातून भव्य बाईक रॅली
बारामती : दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका व शहर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता व त्याच अनुषंगाने वंचित बहुजन युवा आघाडीकडून इंदापूर शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात इंदापूर शहरात बाईक रॅली काढून करण्यात आली. या बाईक रॅलीमध्ये इंदापूर तालुक्यातील अनेक युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. बाईक रॅलीची सुरुवात इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहापासून झाली. शहरांमधील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत संपूर्ण शहरामध्ये फेरी मारण्यात आली. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, तथागत गौतम बुद्ध, अहिल्यादेवी होळकर इत्यादी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर इंदापूर शहर शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका व शहर पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. ऋषिकेश भाऊ नांगरे पाटील (वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य तथा पुणे जिल्हा निरीक्षक) व मा.विशाल भाऊ गवळी (वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य) व मा.मंगलदास भाऊ निकाळजे (जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व) हे लाभले होते.
तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा.प्रतीक चव्हाण (जिल्हा महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व) मा. गणेश थोरात (उपाध्यक्ष पुणे जिल्हा पूर्व) मा.कृष्णा साळुंखे (सहसचिव पुणे जिल्हा पूर्व), मा.विनय दामोदर (वंचित बहुजन आघाडी बारामती शहर सचिव) इत्यादी उपस्थित होते.
यामध्ये सर्वप्रथम पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी सर्व वंचित घटकांपर्यंत पोहोचून तळागाळातील लोकांची कामे करून लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आवाहन करत पक्ष वाढवण्याचे आव्हान केले व वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य विशाल भाऊ गवळी यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करत पक्ष संघटनाचे काम मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य तथा पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश भाऊ नांगरे पाटील यांनी संपूर्ण तालुक्यात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून पक्ष वाढीसाठी काम करण्याचे तसेच येणाऱ्या विधानसभेत आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल यावर मार्गदर्शन करत पक्ष संघटन वाढवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमांमध्ये इंदापूर तालुका अध्यक्ष पदी किर्तीकुमार वाघमारे तर महासचिव पदी सोमनाथ खानेवाले व शैलेश सोनवणे यांची निवड करण्यात आली तर इंदापूर शहर अध्यक्षपदी निलेश मखरे व महासचिव पदी तेजस सरतापे यांची निवड करण्यात आली व संपूर्ण तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना इंदापूर तालुकाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांनी केली तर पुणे जिल्हा पूर्व महासचिव प्रतीक चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका अध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे व संपूर्ण कार्यकारणी यांनी केले होते.