बारामती:-संभाजी भिडे मूळचे (मनोहर कुलकर्णी) यांच्या विदर्भ दौऱ्यामध्ये अमरावती येथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबत खूप खालच्या थराचे वाईट शब्दात वादग्रस्त वक्तव्य केले आहेत.राष्ट्रपिता महात्मा गांधी ,महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दल समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा म्हणून विधान केले असून त्यांची तात्काळ चौकशी करून अटक करावी. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी असे निवेदन देण्यात आले. बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, बारामती.याच्या वतीने निषेध सभा व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या निषेध सभा व निषेध मोर्चास काँग्रेस पक्ष , वंचित बहुजन आघाडी , संभाजी बिग्रेड , बौध्द युवव संघटना , आर पी आय (ए – गट) , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बारामती , बारामती तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , श्री.संत सावतामाळी संघ,बारामती तालुका,सावता परिषद बारामती , मानव अधिकार संघटना , मराठा सेवा संघ , आणि आदरणीय श्री.सुरेश खोपडे साहेब माजी निवृत्त आयपीएस अधिकारी यांनी एकमताने पाठिंबा दिला





