बारामती : जळोची ग्रामपंचायत 2013 साली नगरपरिषद मधे वर्ग झालेली आहे.तेव्हा पासुन जळोची (ग्रामपंचायत) क्षेत्रीय कार्यालयाचे डागडुजी चे काम झालेले नाही, इमारतीचा कलर/रंग खराब झालेला आहे, दरवाजे खराब झाले असून खिडक्या मोडून पडल्या आहेत, दरवाजे सहज तोडता येतील अशी परस्थीती झालेले आहे, त्यामुळे कागदपत्रे दस्तावेज गहाळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्या बरोबर आत मधील शौचालयाची आवस्था फार खराब झालेली आहे. मुख्याधिकारी यांना वारंवार ही गोष्ट निदर्शनास आणुन दिलेली आहे, सदरच्या इमारतीच्या डागडुजी च्या कामाची गांभिर्याने दखल घेऊन लवकरात लवकर पूर्तता करून घ्यावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतिने आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.





