बारामती:- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी उपस्थितांना माता रमाई यांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती दिली. अण्णा नामदास, विनोदकुमार भिसे,तात्यासाहेब झेंडे,शफिक इनामदार यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा संघटक दीपक कदम,आण्णा नामदास, जालिंदर बालगुडे,शफीक इनामदार,तात्यासाहेब झेंडे उपाध्यक्ष बारामती तालुका कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे सुनिल कुचेकर, मुख्याध्यापक शाळा शिर्सूफळ हनुमंत आगवणे व बारामती तालुका कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रसिद्धीप्रमुख गोरक्षनाथ लडकत यांनी केले.
बारामती:-बारामती तालुका ग्राहक पंचायत तर्फे रथसप्तमी व राष्ट्रीय प्रवासी दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायत बारामती तालुका निर्मित दिनदर्शिकेचे प्रकाशन बारामती उपविभागीय अधिकारी श्री गणेश इंगळे, बारामती परिवहन विभाग अधिकारी श्री पाटील, उपविभागीय परिवहन अधिकारी श्री केसकर, बारामती रेल्वे विभाग प्रमुख श्री पाटील आणि ग्राहक पंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी रेल्वेचे वाहक मोटरमन यांचा फेटा बांधून, हार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्राहक पंचायत बारामती तालुक्याचे डॉ. नवनाथ मलगुंडे, प्रा. रवींद्र टिळेकर, शेखर हुलगे, तानाजी गोफणे , संतोष जगताप, ऋषिकेश माकर, गणेश लोखंडे, तसेच पत्रकार घनशाम केळकर व स्वप्निल कांबळे उपस्थित होते.






