
बारामती : कै.चंद्रकांत बाजीराव पिसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने फोंडवाडा येथे श्री हनुमान क्रीडा मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.आज त्यांच्या विनंतीला मान देऊन फोंडवाडा, जळगाव कप,जळगाव सुपे, भिलारवाडी,काऱ्हाटी,माळवाडी,अंजनगाव,बारामती,भवानीनगर येथून मित्र परिवार यांनी येऊन रक्तदान केले.पिसाळ तात्यांचे आयुष्यमान 69 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे 71 पिशवी रक्तदान करून घेतल्याबद्दल तसेच गेली 15 वर्षे रुग्णांना आरोग्य सेवा देत असताना सामाजिक बांधिलकी समजून आज रक्तदान शिबिर आयोजिले म्हणून तसेच स्वतःचे कुटुंबातील सर्वांचेच रक्तदान करून घेतले त्याबद्दल डॉ.अविनाश बारवकर (मेडिकल ऑफिसर) सरांनी कै.माणिकभाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती तर्फे डॉ अतुल चंद्रकांत पिसाळ यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केल. रक्तदान शिबिरासाठी ब्लड बँकेचे श्री सोमनाथ कवडे (PRO) तसेच श्री हनुमान क्रीडा मंडळ यांनी प्रयत्न केले. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे . एक रक्तदाता ची पिशवी 3 लोकांना जीवदान देते. पैसा ,पद,जात, पात,धर्म बाजूला ठेवून आपण रक्तदान केलं.सामाजिक बांधिलकी जपत हे कृतीतून दाखवून दिले त्याबद्दल डॉ.अतुल पिसाळ यांनी सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.डॉ.अविनाश बारवकर सरांना शाल,श्रीफळ देऊन मंडळाने सन्मानित केले आणि सर्वांनाच 2.9.2025 ला वडिलांच्या पुण्यस्मरणासाठी निमंत्रित केले




