सोनतारण कर्जाची नोटीस दिलेचे कारणावरून शिविगाळ दमदाटी करून मारहाण


वडगाव निंबाळकर : सोनेतारण कर्जाची नोटीस दिलेचे कारणावरून शिविगाळ दमदाटी करून मारहाण केल्यामुळे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्ह्याची हकिगत अशी की 29/3/2022 रोजी दुपारी 13.15 वाचे सुमारास मौजे सुपा गावचे हददीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा सुपे तारखेस वेळी व ठिकाणी आरोपी अभिनय उर्फ काका कुतवळ पुर्ण नांव माहित नाही.रा सुपा ता बारामती जि. पुणे याने पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत येवून आरोपीचा नातेवाईक सागर अरविंद कुतवळ रा कुतवळवाडी ता बारामती जि पुणे यास सोनतारण कर्जाची नोटीस दिलेचे कारणावरून आरोपी अभिनय उर्फ काका कुतवळ पुर्ण नांव माहित नाही.याने फिर्यादी दत्तात्रय पांडुरंग कदम वय 40 वर्षे व्यवसाय नोकरी ( PDCC बॅक सुपा) माळेगाव बु ता. बारामती जि पुणे यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहान करून उजवा हात पिरगळुन खुर्चीवर ढकलुन देवुन खुर्चीवर वरून खाली फर्शिवर पडुन खुर्ची उजवे हाताचे बोटावर मारून त्यात फिर्यादीचा उजवा हाताची कंरगळी फॅक्चर करून जखमी केले आहे म्हणुन फिर्यादीची त्याचे विरूध्द कायदेशिर फिर्याद आहे. वगैरे मजकुरावरून गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये रजि.दाखल करुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.न्यायालयात पाठविण्याची तजविज ठेवली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोसई शेख सो हे करीत आहेत .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page