रविंद्र बनसोडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार..!


माळेगांव (ता: बारामती)
शहाजी विद्यालय सुपे ता.बारामती येथिल इंग्रजी विषयाचे शिक्षक रविंद्र बनसोडे यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर या संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कार देण्यात आले.शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रविंद्र बनसोडे यांना नागपूर येथे भंन्ते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.


यावेळी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.दीपक खोब्रागडे, कार्यवाह डॉ.रविंद्र तिरपुडे, सरचिटणीस सुजित मुरमाडे, सुजाता बनसोडे,चिराग बनसोडे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शहाजी विद्यालय सुपे मुख्याध्यापक व्हि.बी. जाधव , उपमुख्याध्यापक बी .व्हि. गुलदगड ,सुपेच्या सरपंच स्वाती अनिल हिरवे माजी सभापती संजय भोसले, रिपाइंचे विश्वास भोसले व शिक्षकांनी बनसोडे यांचे अभिनंदन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page