बारामती:बारामती नगरपरिषद आणि पूर्ण महाराष्ट्र मध्ये स्वच्छ आणि सुंदर शहर यांविषयी अभियान सुरु आहे त्यातच बारामती मध्ये स्वच्छ सुंदर बारामती करण्याकरिता पहिला नंबर घेण्याकरिता बारामती नगरपरिषद सातत्याने प्रामाणिकपणे काम करीत आहे

परंतु हे काम कागदोपत्री राहात आहे की काय ? नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे बारामती कसबा येथील लेंडी पट्टी येथील वाड्यामध्ये संपूर्ण कसबा परिसरातील दूषित पाणी ओढ्यामध्ये मध्ये सर्रासपणे सोडले जात आहे गटारी आहेत परंतु चेंबर नाही लेंडी नाल्याच्या संरक्षणासाठी बांधलेले संरक्षक भिंतीच्या बाजूने संपूर्ण पाणी साचून त्याठिकाणी दुर्गंधी तयार झालेले आहे मच्छर आणि अनेक कीटकजन्य जीवजंतू तिथे वाढू लागले आहेत त्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये साथीचे आजार डासांमुळे होणारे गंभीर आजार यांना सामोरे जावे लागत आहे आणि अशी परिस्थिती असताना स्वच्छ आणि सुंदर बारामतीची स्वप्ने बारामती नागरिक पहात आहे .ओढ्याच्या बाजूने संपूर्ण कचऱ्याचे ढिगारे झाले असून उकिरडा तयार झालेला आहे बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक मुख्याधिकारी याकडे लक्ष देतील का नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. म्हणून लोकं गाणं म्हणत आहे स्वच्छ सुंदर बारामती नाल्याचे गटाराचे पाणी ओढ्यामध्ये येती.
पाण्याचे प्रदूषण होत असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सामजिक संघटना तक्रार करणार असल्याची देखील चर्चा होत आहे. जलसंपदा विभाग,पाठबंधारे विभाग,बारामती नगर परिषद पाणी सोडणाऱ्यावर कारवाई करतील का?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.







