बारामती शहरात राजरोसपणे सुरू असलेल्याअवैध मटका धंद्यावर कधी होणार कारवाई?


बारामती : बारामती शहरातील बारामती माळेगाव रोड नदीच्या पुलापासून डाव्या बाजूला लोकवस्तीत राजरोसपणे मटका चालू आहे.एका खोलीत चार लोक मटका चिट्या देण्यासाठी काम करीत आहेत.मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हा मटक्याचा धंदा याठिकाणी सुरू आहे.या मटका धंद्याची माहिती पोलिसांना मिळत नाही का?
सदर मटका सुरू असलेले व्हिडिओ चित्रीकरण महाराष्ट्राच्या नेतृत्वच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.बारामतीत अवैध व्यवसाय राजरोसपणे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत.अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.अशा अवैध व्यवसायांवर कारवाई करा असे पोलीस आधिक्षक यांचे आदेश असताना देखील कारवाई करण्यास का दिरंगाई होत आहे? असा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो. बारामती शहर पोलिस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी मटका व्यवसाय सुरू आहेत.तसेच गुटखा विक्री जोमात चालू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page