पुणे: जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीसाठी समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे श्रीमती संगिता डावखर, पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत नोंद झालेले गुन्हे, पोलीस तपासावर प्रलंबित प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, अत्याचार पिडीतांना आर्थिक सहाय्य मंजुरी दिलेल्या प्रकरणांचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती यांनी दरमहा बैठक घेऊन त्याबाबतचा अहवाल जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीस सदर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असल्याने शासकीय अभियोक्ता यांना बैठकीस उपस्थित राहणेबाबत सूचित करण्यात आले. पिडीत व्यक्तींच्या वारसास पेन्शन, नोकरी देणेबाबत संबंधित वारसदारांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून नियमानुसार कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. पुणे जिल्ह्यांतर्गत येणार्या सर्व पोलीस स्टेशनला दक्षता व नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यांची नावांचा फलक लावणेबाबत तसा आदेश देण्यात आलेला आहे. पिडीत व्यक्तींच्या वारसांचे जातीचे दाखले प्रलंबित आहेत ते दाखले तातडीने देणेबाबत उपविभागीय अधिकार्यांना योग्य ते आदेश देणार असल्याचेही श्री.देशमुख यांनी सांगितले.
यावेळी पिंपरी चिंचवड विभागाचे सहा.पो.नि. व्ही.एन.जगदाळे, ग्रामीणचे पी.आय. भाऊसाहेब पाटील, नाहस पथकाचे सहा.पो.नि. जी.आर.इनामदार,पिंपरी चिंचवडच्या श्रीमती नम्रता सकट, पुणे शहरच्या धनश्री कामठे, सदस्य संतोष शेलार,चेतन जेधे, लहूआण्णा निंगुणे, राजेंद्र गायकवाड, साधु बल्लाळ, जी.के.आल्हाट इ. मान्यवर उपस्थित होते.
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची आढावा बैठक -
समाजातील गरीब वंचित दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणार :- वैभवजी गिते




