बारामती : संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना देखील बारामती शहरातील किराणा मालाच्या दुकानात, पानटपरीतून गुटखा विक्री जोमात चालू आहे. या दुकानापर्यंत गुटखा पोहचतो कसा?
सुरू असलेल्या गुटखा विक्रीकडे अन्न व औषध प्रशासन तसेच बारामती पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. गुटखा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
गुटख्याची अवैध्य वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.बारामती मध्ये युवा वर्ग व्यस्नाधीन होऊ नये म्हणून तात्काळ गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे आहे.






