बारामती दि. १५ : आदिवासी समाजक्रांतीचे जनक व स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज तहसिल कार्यालयामध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.








