बारामती : मटका व्यवसाय लोकवस्तीत चालू असल्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे. बारामती शहरातील सटवाजी नगर कमानी पासून डाव्या बाजूच्या परिसरात मटका व्यवसाय खुलेआम चालू आहे.तरी देखील पोलीस प्रशासन कारवाई करीत नाही.असे अवैध व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
शहरातील इतर भागात देखील असे व्यवसाय चालू आहेत.
गुटखा विक्री चालू आहे.सदर गुटखा विक्री साठी पुरवठा होतो कसा वाहतूक होत असताना पोलिसांना माहिती मिळत नाही का?
मटका चालकांवर तात्काळ कारवाई करून लोकवस्तीत सुरू असलेले मटका व्यवसाय बंद झाले पाहिजे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.पोलीस प्रशासन कारवाई कधी करणार?






