बारामती : येथील मानव एकता युवक संघटना, शेरसुहास मित्र मंडळ आणि भारतदादा अहिवळे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि.९) रोजी आमराई परिसरातील महात्मा फुले नगर येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लिम बांधव आणि महिलांसह बहुजन समाजातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या देशातील सामाजिक वातावरण काही शक्तींकडून दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असून,यामुळे आपल्या देशाची अखंडता आणि सामाजिक बांधिलकी धोक्यात आली आहे.आपल्या देशातील सर्व समाजांमध्ये असलेले सामाजिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आपण या इफ्तार पार्टीचे आयोजन केले असल्याचे यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक आणि भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुशिल अहिवळे आणि शुभम अहिवळे यांनी सांगितले.

दरम्यान या कार्यक्रमाला,माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,माजी नगरसेवक असिफ खान,ॲड.अब्दुलकरीम बागवान,अस्लम तांबोळी,मुनीर तांबोळी,प्रो.सलीम बागवान,तैनूर शेख,बिलाल बागवान,इम्रान पठाण,सिकंदर शेख,अशपाक सय्यद,गौतम शिंदे,सोमनाथ रणदिवे,रितेश गायकवाड,अमोल रणदिवे,बबलू जगताप व आदी उपस्थित होते.






