बारामती :बारामतीचा विकास नेहमी चर्चेत असतो त्याचे कारण सुधा तसेच आहे बारामतीत बस स्थानक पाहिले तर नक्कीच विमान तळ असल्यासारखे बांधले आहे त्याच विमानतळाचे समोरील बाजूला राहणाऱ्या दलित वस्तीतील लोकांना आजपर्यंत सार्वजनिक शौचालय नाही.
बारामती शहरातील भाजी मंडई आणि वाहन तळासाठी मोठी इमारत आहे.त्याच्या बाजूला मच्छी मार्केटची इमारत आहे. या इमारतीसमोर बाजूला पानगल्ली आहे या भागातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली होती.या शौचलयासाठी स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संघटना यांना आंदोलन करावे लागले होते. यानंतर शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली अद्याप नवीन शौचालय त्या ठिकाणी मिळाले नाही.
दलित वस्ती ची पाहणी केल्यानंतर आपल्या समोर विकासाचे वारे या वस्तीत कधी वाहिले नाही का?असे वाटेल. समाज मंदिरे बांधून दिली म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही.
बारामतीत कंपन्या आहेत पण याठिकाणी किती स्थानिक ठेकेदार आहेत तसेच स्थानिक कामगार किती आहेत याची पाहणी केली पाहिजे म्हणजे रोजगार किती लोकांना मिळतो हे पाहण्यासारखे आहे.
मोठी शासकीय हॉस्पिटल बांधली पण यामध्ये सर्व सोयी जनतेला मिळतात का? पेशंटला/रुग्णाला औषध दिले जातात ती रुग्णालयात उपलब्ध नसतात तर त्याची नोंद हॉस्पिटल/रुग्णालय ठेवत नाही सदर नोंद ठेवल्यास जेणेकरून पुढील वेळेस औषधे मिळतील.
रस्ते करण्यासाठी नागरिकांना वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करावा लागतो.हद्द वाढ झालेल्या ठिकाणी अजून देखील सर्व सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत परंतु कर मात्र आकारला जातो.
ग्रामीण भागात पाण्याची प्रश्न आज देखील सुटले नाहीत.कदाचित या वेळेस तरी पाणी प्रश्न सुटणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शिक्षण मोफत मिळाले पाहिजे जेणेकरून पुढील पिढी साक्षर होईल.परंतु बारामतीत शासकीय महाविद्यालय नाही.शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळा नाहीत.पालकांची परिस्थिती नसल्यामुळे कित्येक हुशार मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. आर. टी. ई.कायद्यात बदल झाल्यामुळे ज्या खाजगी शाळेमध्ये मुलांना शिक्षण मिळत होते ते देखील बंद झाले आहे.सरकारी शाळेला प्राधान्य दिले जाणार आहे परंतु त्या सरकारी शाळेच्या दुरावस्थेवर बोलायला कोणी तयार नाही.
आमची चर्चा फक्त ताई की वहिनी निवडून येणार यावर होताना दिसत आहे.मूलभूत प्रश्न सुटले नाहीत त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे.जनेतेचे प्रश्न मार्गी न लागता विकासाचे मॉडेल म्हणायचे का असा प्रश्न उपस्थित होतो.
पुढील बातमीत विकास आणि अविकास अशी माहिती देणार आहे.






