बारामती : बारामती शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे नगर येथे अस्वच्छ पाणी पुरवठा केल्याची माहिती नागरिकांनी महाराष्ट्राचे नेतृत्वाला दिली.नागरिकांची मागणी आहे की स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहिजे.अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
सदर विषयबाबत बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना माहिती दिली असता त्यांनी सांगितले की तात्काळ बारामती नगर परिषदेचे कर्मचारी पाठवून पाईपलाइन पाहणी करून जर कुठे फुटली असेल तर तात्काळ दुरुस्त करू आणि स्वच्छ पाणी नागरिकांना दिले जाईल.
बारामती नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठा केल्यानंतर पाहणी करणे गरजेचे आहे.जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडवले जातील.