बारामती : बारामती शहरातील आमराई परिसरातील अनंत नगर येथील सार्वजनिक शौचालयाची बातमी महाराष्ट्राचे नेतृत्व च्या माध्यमातून प्रसिद्ध केल्यांनंतर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. बातमी किंवा निवेदन, तक्रारी अर्ज दिल्यानंतरच कामे होणार का? सार्वजनिक कामांसाठी देखील नागरिकांना बारामती नगर परिषद समोर आंदोलन करण्याची वेळ का येत असते?
विकास कामे करताना त्याच्या देखभालीसाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. मोठे इमारती बांधून त्याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले जाते या विकास कामांच्या देखभाल करण्यासाठी उपाययोजना प्रशासन करणार का?
बारामती नगर परिषद हद्दीत झाडे वाढल्यानंतर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर झाडे तोडली जातात. सार्वजनिक शौचालय स्वच्छता करणेसाठी नागरिकांना अर्ज किंवा तक्रार का द्यावी लागते.चेंबर तुंबले त्यासाठी देखील नागरिकांनी तक्रार करून पाठपुरावा केला तरच ते कामे केले जात असे नागरिकांमध्ये अनेक वेळा बोलले जाते.
स्वच्छतेचा ठेका दिला असताना देखील सार्वजनिक शौचालय स्वच्छ का होत नाही.दिवसातून दोन वेळा स्वच्छ करण्याचा ठेका दिला असताना देखील स्वच्छता का होत नाही याकडे आरोग्य विभागप्रमुखांनी लक्ष दिले पाहिजे. शौचालयाच्या परिसर देखील स्वच्छ का होत नाही? रोजच्या कामाची नोंद होते तरी देखील कामे होत नाहीत.
नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत त्यामुळे नागरिकांना मुख्याधिकारी यांच्या समक्ष येऊन आपल्या तक्रारी मांडावे लागतात. मुख्याधिकारी यांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना विचारणा केली पाहिजे की नागरिकांचे काम वेळेत का पूर्ण केले नाही.जेणेकरून मुख्याधिकारी यांना भेटून तक्रार करण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही.






