बारामती : बारामती तालुका हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन च्या हद्दीत गुटखा विक्री होत आहे.हा गुटखा पुरवठादार कोण आहे? याची माहिती पोलिसांना मिळत नाही का?अन्न व औषध प्रशासन यावर कारवाई करताना दिसत नाही.
गुटखा वाहतूक होत असताना का कारवाई होत नाही? ग्रामीण भागात गुटखा साठवून त्या ठिकाणाहून पुरवठा केला जातो.अशी नागरीकांमध्ये चर्चा आहे.गुटखा पुरवठा करण्यासाठी युवकांचा उपयोग केला जातो. स्कुटी गाडीवर कापडी पिशवी मधून हा गुटखा दुकानापर्यंत पोहचविला जातो.याची माहिती पोलिसांना मिळत नाही का?गुटखा खाण्याचे प्रमाण युवकांमध्ये वाढले आहे.महाराष्ट्रात उत्पादन बंद असून देखील बारामतीत गुटखा विक्री साठी येतो कोठून? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
-
राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती तात्काळ बंद करावी- संभाजी ब्रिगेडची मागणी -
बारामती नगर परिषदसमोर आंदोलन केल्यावरच कामे होणार का?




