प्रतिनिधी : गणेश थोरात
पुणे : बुलेट दुचाकी मध्ये बदल करून करकर्ष आवाज करणारे तसेच जोरात फटाके वाजविणे असे बेकायदेशीर रित्या कृत्य करून लोकांना त्रास देणाऱ्या बुलेट गाडी पिंपरी चिंचवड परिसरात संख्या वाढत चालली आहे त्याचा त्रास महिला वर्ग, वृध्द वर्ग तसेच लोकांना सदर आवाजाचा त्रास होत आहे त्यामुळे अश्या बेकायदेशीर बुलेट चालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार ॲड.नितीन व्ही.मस्के यांनी पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्याकडे येथे केली असता
वाकड पोलिस ठाणे यांनी ३१७ वाहन चालकांवर कारवाई करून ३,१६,५०० रुपयांचा दंड आकारला आहे. जास्तीची कारवाही करण्याचे चालू आहे असे समजपत्र देऊन ॲड.नितीन व्ही.मस्के यांना कळवले आहे .






