बारामती : बारामती इंदापूर रोड पिंपळी येथे रस्त्याच्या कडेला पान टपरीतून अवैध दारू विक्री सुरू आहे.रस्त्याच्या कडेला खुलेआम अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क कधी कारवाई करणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.
बारामती शहरात अनेक ठिकाणी छोट्या पान टपरी,किराणा मालाचे दुकान मध्ये गुटखा विक्री जोमात चालू आहे.या दुकान ,टपरी पर्यंत गुटखा कोण पोहोचवतो? या गुटख्याच्या अवैध वाहतुकीची माहिती पोलीस प्रशासनाला मिळत नाही का? गुटखा विकणारे, गुटख्याची अवैध वाहतूक करणारे, पुरवठा करणाऱ्यां वरती कधी कारवाई होणार?
बारामती मोरगाव रोड कदम चौक बारामती परिसरात अवैध मटका मोठ्या प्रमाणावर चालू आहे.बारामती शहरातील अवैध व्यवसायावर कधी कारवाई होणार?पोलीस प्रशासनाला या अवैध व्यवसायाची माहिती मिळत नाही का? पत्रकार किंवा सामान्य नागरिकांनी माहिती दिली तर सदर व्यवसायांवर एकदा कारवाई होते.थोड्या दिवसानंतर परत व्यवसाय सुरू होतो.पुन्हा अवैध व्यवसाय सुरू होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन प्रतिबंधात्मक उपाय करणार का?
-
महिला रुग्णालय येथे ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा शुभारंभ
-
विधायक मार्गाने महापुरुषांची जयंती साजरी करणे कौतुकास्पद -संभाजी होळकर