बारामती : बारामती शहरातील युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. बारामती शहरातील परवाना धारक दारू विक्री करणारे नियमाचे पालन करताना दिसत नाही.परवाना धारक दारूची दुकाने,परमिट रूम,बियर बार सकाळी ७:०० वाजता दारू विक्री सुरू करतात.परवाना धारक यांना शासनाने वेळ ठरवून दिलेल्या वेळेचे पालन दुकानदार करीत नाहीत.तरी उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
काही दुकाने रहदारीच्या ठिकाणी,मंडईत,चौकात आहेत.असे दुकानदार सकाळी दुकान चालू करून दारू विक्री करतात. चौकातील दारू विक्री करणारे मालक पुढील बाजूचे शटर बंद ठेऊन मागील दरवाज्याने ग्राहकाला आतमध्ये बसायची व्यवस्था करून व्यवसाय सुरू ठेवतात.बारामतीत उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असून देखील उघडपणे नियम मोडून दारू विक्री होत आहे.या दुकानांवर कारवाई कधी होणार?परवाना धारक असल्यामुळे नियम मोडणार का?
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई होणार का? उत्पादन शुल्क विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत नाही ना?अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
-
पुसेसावळी येथील निंदनीय घटनेचा निषेध व दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुस्लिम युवकांनी दिले निवेदन -
गणेश विसर्जन सोहळा – २०२३ कामी बारामती नगरपरिषद यंत्रणा सज्ज




