सूर्यनगरी येथील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा स्थनिक नागरिकांची मागणी


बारामती : बारामती सुर्यनगरी येथे भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास होत आहे, लहान मुलांवर, महिलांवर,दुचाकीवरून जाताना मागे धावून चावा घेणे असे प्रकार घडत आहे.बारामती नगरपालिका मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करण्यासाठी फक्त जाहिरात देऊन या कामासाठी ठेकेदार नेमणूक करून सदर ठेकेदाराचे फक्त खिसे भरले जातात अशी नागरिकांमधे चर्चा आहे.
बारामती विकासाचे माॅडेल समजले जाते पंरतू नगरपालिका सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही अशी वस्तुस्थिती आहे.
अनेक प्रकारचे कर मात्र आवर्जून गोळा करते.नगरपालिकेच्या गलथान कारभारावर सद्या भारतीय युवा पँथर संघटना आसुड ओढण्याचे काम करीत असून सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठवून नागरिकांना सहकार्य करीत आहे.म्हणून स्थानिक नागरीकांनी भारतीय युवा पँथर संघटनेकडे तक्रार सांगितली की बारामती नगर परिषदेने मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केला आहे सदर ठेकेदाराला वारंवार फोन करून देखील आमच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नाही.
सदर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा अशी नागरिकांची मागणी आहे.सदर नागरिकांच्या मागणीसाठी भारतीय युवा पँथर संघटना ठेकेदाराला संपर्क करणार आहे आणि जर ठेकेदाराने काम केले नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील संघटनेच्या वतीने करणार असल्याचे भारतीय युवा पँथर संघटना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page