बारामती तालुका पोलिस स्टेशन येथे फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामधील आरोपींना अटक करा यासाठी फिर्यादी महिलेला आंदोलन उपोषण करावे लागले.पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयासमोर देखील आंदोलन केले त्यानंतर एक आरोपी अटक केला.अद्यापपर्यंत दोन आरोपींना अटक नाही.
महिला फिर्यादीला पोलिसांकडून सांगितले जाते की आरोपीची माहिती घ्या आम्हाला सांगा मग आम्ही आरोपी पकडतो.सदर आरोपीची माहिती देऊन सुद्धा आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी ठरले .असे महिला फिर्यादीने आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न निर्माण होत आहे?
फिर्यादी महिला उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या कार्यालयावर महिला मोर्चा काढणार असल्याचे फिर्यादी महिलेने यावेळी सांगितले.
बारामती पोलिसांकडून गुन्ह्यांची माहिती पत्रकारांना दिली जात नाही. पत्रकार पोलीस व्हॉट्सअँप ग्रुप नावा पुरते आहेत का? पोलिसांनी एखादी कारवाई केली तर तात्काळ प्रेस नोट दिली जाते. पोलिसांनी केलेल्या कारवाईला पत्रकार प्रसिद्धी देण्याचे काम करतात. परंतु इतर वेळेस हेच अधिकारी पत्रकारांचे फोन घेत नाहीत.किंवा माहिती देत नाहीत.
बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कोयते घेऊन टोळकी फिरत आहेत.नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. खरच बारामती सुरक्षित आहे? अशी चर्चा होत आहे. अवैध धंदे जोमात सुरू आहेत त्यामुळे देखील गुन्हेगारी वाढत आहे.मटका,गुटखा जुगार,दारू असे अनेक अवैध व्यवसाय राजरोसपणे चालू आहेत. या धंद्यावर कारवाई कधी होणार?
ग्रामीण भागातील महिला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना घडत असलेल्या घटनांबाबत पत्र देणार आहेत. बारामती तालुक्यात गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती राहिली नाही असे नागरिकांमधून बोलले जात आहे.