बारामती: जंक्शन ता.इंदापूर येथील बनसोडे परिवार हे गेली कित्येक वर्षापासून भीमगीते गाऊन आपला उदरनिर्वाह करतात परंतु या दोन वर्षांमध्ये कोरोना माहामारीमुळे कार्यक्रम बंद असलेने त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झालेली होती.

खूप हालअपेष्टांना सामोरे जावे लागल्याने त्यांना मदत म्हणून सम्यक सोशल क्लब बुद्ध विहार सिद्धार्थ नगर यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते नितीन दादा शेलार तसेच माजी नगरसेवक बानप अभिजीत चव्हाण यांच्या पुढाकाराने बारामती मधील नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली ते शुभम मिलिंद शिंदे यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली याप्रसंगी माजी नगरसेवक निता अभिजीत चव्हाण तसेच पत्रकार तानाजी पाथरकर, संतोष लोंढे, मिलिंद शिंदे,दिलीप भोसले उपस्थित होते.






