बारामती :बारामती शहरातील कसबा साठेनगर येथील राष्ट्रवादीचे युवा नेते विक्रम (दादा) लांडगे यांच्या वाढदिवसनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.

या वर्षी देखील विक्रम काशीनाथ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी,मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप कार्यक्रम लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ तसेच विक्रम लांडगे युवा शक्ती बारामती व बुधरणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील नाम फलकाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती बारामती सहकारी बँकेचे संचालक सचिन सातव, रा.कॉ. पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव,सदस्य समाजकल्याण दक्षता समिती पुणे साधू बल्लाळ,झोपडपट्टी सुरक्षा दल प.म.प्रमुख बापू शेंडगे,सामाजिक कार्यकर्ते अनिल खुडे,संजय भोसले, अमर कांबळे, सतिश मोहिते,बडेभाई मोमीन, होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
अक्षय लांडगे,सतिश नेटके, भारत नेटके, महेश नेटके,उत्तम खरात,मच्छिंद्र नेटके,नितीन खरात,अमन मंडले, अतिश लांडगे,दिपक तुपे,संदीप नेटके,सागर पाटोळे,विश्वास लांडगे, संतोष साळवे, ,सुरेश अवघडे यांनी सहकार्य केले. सदर नेत्रतपासणी शिबिरात ३६१ नागरिकांची तपासणी केली, तसेच या वेळी बारामती नगरपरिषद बारामती यांच्या माझी वसुंधरा २.० अभियाना अंतर्गत हरित शपथ घेण्यात आली व झाडे लावणे व पाणीबचती विषयी जनजागृती करण्यात आली.







