जनहित प्रतिष्ठानचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश


बारामती शहरातील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बारामती येथिल तालुका स्तरीय झालेल्या कबड्डी स्पर्धेत या वर्षी १४ वर्षाखालील मुली व १७ वर्षाखालील मुलींच्या दोन्ही संघांनी प्रभावशाली कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून या दोन्ही संघाची निवड खेड या ठिकाणी होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे ़

विदयार्थ्यांना क्रिडाशिक्षक नाळे सर, शिक्षक अजिंक्य साळी , शिक्षिका वृषाली खारतोडे यानीं मार्गदर्शन केले ़ सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किशोर कानिटकर , उपाध्यक्ष सतीश गायकवाड, खजिनदार सतिश धोकटे , सहसचिव घारे , गुरूकुल चे आचार्य हनुमंत दुधाळ , विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल काटे आदींनी अभिनंदन केले़.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page