कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी जनशक्ती कामगार संघटना मैदानात; सामाजिक कार्यकर्ते दया दामोदरे यांचा ठाम पाठिंबा


कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जनशक्ती कामगार संघटना मैदानात उतरली असून कामगारांच्या हक्कासाठी संघटनेची लढाई अधिक तीव्र झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे हे सुरुवातीपासूनच कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.
कामगारांचे म्हणणे आहे की, काही व्यक्तींना एकत्र करून संघटना उभी राहत नाही; त्यासाठी कामगारांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि नेतृत्वावर ठाम श्रद्धा आवश्यक असते. जनशक्ती संघटनेने आपल्या सातत्यपूर्ण भूमिकेमुळे कामगारांमध्ये विश्वास निर्माण केला असून संघटनेच्या वाढत्या पाठिंब्यातून त्याचा प्रत्यय येत आहे.
दरम्यान, काही राजकीय स्वार्थातून पर्यायी संघटना उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा कामगारांमध्ये रंगत आहे. मात्र, कामगारांचा ठाम विश्वास जनशक्ती संघटनेवर असल्यामुळे अशा प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
सामाजिक कार्यकर्ते दया दामोदरे यांनी जनशक्ती संघटनेच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देत म्हटले की, “कामगारांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सामाजिक जबाबदारी आहे. कामगारांची एकजूट हीच त्यांची खरी ताकद आहे.”
कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जनशक्ती कामगार संघटना आगामी काळात कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठीच निस्वार्थपणे लढणार . कामगारांच्या हक्कासाठी सुरू असलेली ही लढाई पुढील काळात निर्णायक ठरणार असल्याचे आंदोलनावरुन दिसत आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page