कऱ्हानदी काठच्या लोकांना महत्वाची सूचना – नाझरे धरण


प्रतिनिधी : गणेश थोरात

*मंगळवार दि.१८/१०/२०२२ :- वेळ सकाळी ५.०० वा.*

सर्वांना याद्वारे कळविण्यात येते कि,नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे धरणात येणार्‍या पाण्याच्या येव्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत सुरु असलेल्या विसर्गात मोठी वाढ झाली असून सध्या ३५२५० क्युसेक्स इतक्या दराने कर्‍हा नदीत विसर्ग चालू आहे. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की,कृपया कर्‍हा नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत.कृपया नदी किनार्‍यावरील सखल भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात अशी विनंती.शाखाधिकारी नाझरे धरण शाखा,नाझरे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page