बानप कामगार सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र बाबुराव सोनवणे तर व्हा.चेअरमनपदी सुवर्णा भापकर यांची बिनविरोध निवड


बारामती : बारामती नगर परिषद कामगार सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र बाबुराव सोनवणे तर व्हा.चेअरमनपदी सुवर्णा भापकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक उपनिबंधक श्री.अमर गायकवाड यांनी निवडणुकीचे काम पाहिले.

यावेळी माजी चेअरमन सुनील धुमाळ, यांच्यासह संचालक प्रतिभा सोनवणे, संजय चव्हाण,भालचंद्र ढमे, फिरोज आत्तार,दादा जोगदंड,अरुण थोरात, विजय शितोळे,उमेश लालबिगे,भारत गदाई,अजय लालबिगे यांच्यासह सचिव अनिल गोंजारी लिपिक विजय राखुंडे हे उपस्थित होते.
कामगाराचे हिताचे व धोरणात्मक निर्णय घेऊ तसेच सर्व सभासदांचा आरोग्य विमा त्याच बरोबर कामगार पतसंस्थेसाठी कायमची हक्काची जागा उपलब्ध करण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे यावेळी चेअरमन राजेंद्र सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page