बारामती : सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, नीरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने व उपलब्ध पाणीसाठा मर्यादीत असल्याने पर्यायाने पाणी पुरवठा एक दिवसाआड बंद ठेवावा लागणार आहे. त्याचे नियोजन बुधवार, दिनांक २१/०९/२०२२ रोजी खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही. तद्नंतर दिवसाआड पाणी पुरवठा होईल
खालील प्रमाणे –
१) कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रियनगर, मेडदरोड, पतंगशाहनगर, महादेव मळा, सदगुरुनगर, अवचट पुरवठा होईल.
इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, वसंतनगर, अवधुतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर
२) म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, विट्टलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर इत्यादी गुरुवार, दिनांक २३/०९/२०२२ रोजी खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही. तद्नंतर दिवसाआड पाणी पुरवठा होईल.
१) कचेरी रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबीर बोळ महावीर पथ, सिध्देश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांडुळवाडी वेस चौक, बुरुड गल्ली, नेवसे रोड.
२) संपुर्ण कसबा, लक्ष्मीनारायणनगर, माळेगाव रोड, जामदार रोड, खंडोबानगर
३) जवाहरनगर, पोष्ट रोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, सिध्दार्थनगर,
तरी वरीलप्रमाणे पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करुन पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे हि विनंती.अशी माहिती बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.






