काऱ्हाटी: मौजे काऱ्हाटी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उमाजी नाईक मित्र मंडळाच्या वतीने भिवडी ता.पुरंदर येथून ज्योत प्रज्वलित करून आणण्यात आली.त्यानंतर गावातून मोठ्या आनंदाने राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी वडगाव नि.पो.स्टे.पोलिस अधिकारी श्री. मोहोळकर साहेब, श्री. वाघोले साहेब,पोलिस पाटील श्री.संजय लोणकर यांचा मंडळाच्या वतीने श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.सुनील भंडलकर आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत कार्यालय काराटी येथे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळेस मंडळाचे सर्व कार्यकर्ते ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बी के जाधव सर ग्रामसेवक जगताप साहेब सामाजिक कार्यकर्ते अशोक खंडाळे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.






