बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबीर संपन्न


बारामती, दि.२१ :- आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलच्या लॉन टेनिस मैदानावर योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, क्रीडा संकुल समितीचे सदस्य अविनाश लगड यांच्यासह विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, बॅडमिंटन, कबड्डी, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, स्पोर्ट्स झुंबा,कराटे या खेळाचे प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

जीवन विद्या योग प्रशिक्षण संस्थेच्या विद्या कानडे यांनी योगा प्रशिक्षण शिबीर घेतले. आभार तालुका क्रीडा अधिकारी  महेश चावले यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page