बारामती शहरातील पाईपलाईनचे काम चालू असल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद


बारामती : बारामती नगर परिषद हद्दीतील भिगवण रोड तीन हत्ती चौका लगतच्या नीरा डावा कालवा पुलावरील पाणी पुरवठ्याच्या दाब नलिका, वितरण नलिका नवीन पुलावरुन स्थानांतरीत करणेचे काम करण्यात येत आहे.सदरच्या पाईप लाईन्स् पूर्ववत जोडणेचे काम करण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने दरम्यान,
१) सिध्दार्थनगर, भीमनगर, चंद्रमणीनगर, विठ्ठलनगर, कोअरहाऊस, वडार सोसायट्या, बढकेनगर, सटवाजीनगर इत्यादी संपूर्ण आमराई विभागात गुरुवार, दिनांक २८/०४/२०२२ रोजी पाणी पुरवठा बंद राहील.
२) विजयनगर, पोस्टरोड, जवाहरनगर, सिनेमारोड, महावीर पथ, बुरुडगल्ली, नेवसे रोड, सिध्देश्वर गल्ली, कसबा गल्ली, सनगर गल्ली, श्रीराम गल्ली या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक २९/०४/२०२२ रोजी बंद राहील.
तरी संबंधित भागातील नागरिकांनी नोंद घेवुन पुरेसा पाणी साठा करून पाणी काटकसरीने वापरुन नगर परिषदेस सहकार्य करावे ही विनंती करण्यात येत आहे.
महेश रोकडे प्रशासक तथा मुख्याधिकारी, गट-अ बारामती नगर परिषद, बारामती यांनी याबाबत माहिती दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page