प्रतिनिधी : गणेश थोरात
बारामती: दि 14 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.जयंतीचे औचित्य साधून को-हाळे बुद्रक कटिंग पुल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे चे पूजन करण्यात आले यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे साहेब, बोल महाराष्ट्र न्यूज चे विभागीय अध्यक्ष महेश चव्हाण लोकमान्य न्यूजचे संपादक सोमनाथ जाधव कामगार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष लखन कडाळे भीम फाउंडेशनचे पदाधिकारी गणेश गायकवाड ,काकासाहेब सोनवणे, मनोज ठोंबरे ,सुदाम चव्हाण ,रवी चव्हाण, संजय साबळे ,किरण कांबळे शेखर पानसरे, विश्वजीत चव्हाण, संदेश चव्हाण, शंकर चव्हाण, प्रतीक चव्हाण, अशोक माळशिकारे,, मनोज कोकणे तसेच पत्रकार अजय पिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना यावेळी दिवसभर थंडगार लिंबू सरबत मोफत वाटप बोल महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष महेश चव्हाण व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याचे आयोजन केले होते

कार्यक्रमाच्या शेवटी वडगाव पोलीस स्टेशन येथे सुंदर अशी संविधानाची प्रत पोलीस स्टेशन ला भीम फाउंडेशन (थोपटेवाडी)कडून भेट देण्यात आली यावेळी परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते.तसेच या विविध गावातील ग्रामपंचायत मध्ये सुद्धा गावातील सरपंच ,उपसरपंच सदस्य, पोलिस पाटील यांच्या उपस्थितत प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
महत्त्वाची बाब म्हणजे विविध गावातील तरुणांनी एकत्र संघटित होऊन (शिका संघटित व्हा ,संघर्ष करा वाक्य प्रमाणे) ही जयंती साजरी केली.






