
बारामती : १८ जुलै २०२५ रोजी, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. जय लहुजी फ्रेंड सर्कल यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णाभाऊंच्या कार्याला आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. याप्रसंगी बारामती नगर परिषद बारामतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचेबारामती शहर अध्यक्ष जय दादा पाटील, महिला शहर अध्यक्ष अनिता (ताई )गायकवाड, नगरसेविका अनिता (ताई )जगताप, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, प्राध्यापक सुनील लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात, प्रतीक ढवाण,ॲड.सोमनाथ पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम लांडगे, संजय भोसले, सुरेश अवघडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेखा खेडकर, संजय वाघमारे,चंदू सावंत, अमर कांबळे, दादा सकट, सनी खरात, दीपक खिलारे, ॲड. सोमनाथ पाटोळे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “अण्णाभाऊ साठे हे केवळ एक साहित्यिक नव्हते, तर ते समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कृतिशील विचारवंत होते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी समाजातील विषमतेवर प्रहार केला आणि कष्टकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडली.”अनिकेत मोहिते बोलताना म्हणाले की कोणत्याही महापुरुषाला जातीच्या धर्माच्या बंधनात अडकवू नका. अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख त्यांच्या लोकनाट्यात, कादंबरीमध्ये, कथेमध्ये आणि त्यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये स्पष्टपणे दिसतो. १९४६ ला निवडणुकीसाठी त्यांनी ‘देशभक्त घोटाळे’ नावाचे लोकनाट्य लिहिले, त्यामध्ये ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ हे प्रसिद्ध कवन गायले. १९५८ ला त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ या बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वर्तमानपत्रात ‘दलित शाहिरी’ या मथळ्याखाली एक लेख लिहिला यामध्ये बाबासाहेबांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. त्यांची उत्कृष्ट कादंबरी ‘फकिरा’ ही १९५९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. अण्णाभाऊंनी ‘बुद्धाची शपथ’ कथा लिहिली. ज्यामध्ये बाबासाहेबांचा स्पष्टपणे उल्लेख आहे. ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा व जातवास्तव’ हा लेख ‘युगांतर’ मधून प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये बाबासाहेबांचा स्पष्टपणे उल्लेख आहे. खालील लिखाणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पष्टपणे उल्लेख सापडतो.
जय लहुजी फ्रेंड सर्कल अध्यक्ष केदार पाटोळे व दत्ता खरात,यांनी उपस्थितांचे आभार मानले. अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज घडवण्याचा संकल्प या निमित्ताने सर्वांनी केला. कार्यक्रमासाठी किरण कसबे, विकास पाटोळे, अजय खरात, रोहित भोसले, सागर निगडे, राहुल खिलारे, योगेश कांबळे, कुणाल कसबे, बाबू खरात, आकाश खुडे. विशेष परिश्रम घेतले.






