बारामती: २४ वर्षांनी पुन्हा एकत्र आले २०००-२००१ साली शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आठणींना पुन्हा उजाळा मिळाला कार्यक्रमास 166 मुलं व मुली उपस्थित होते.
निमित्त होते बारामती शहरातील श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे!
२०००- २००१ साली दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती या ठिकाणी पार पडले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सध्याचे शाळेचे प्राचार्य श्री गणपत तावरे सर उपस्थित होते त्याचबरोबर व्हि बी शिंदे, के बी जाधव, एम जी शिंदे, टी एस जरांडे, डी एन घाडगे, व्ही जी जाधव, दुधाने सर, गावडे सर, साठे सर, मोमीन सर, शिरकांडे सर, के डी पवार, मांडके सर, एस एस जगदाळे, पवार मॅडम, शिरकांडे मॅडम इत्यादी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता दहावीच्या प्रत्येक तुकडीचे एक एक झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले सर्व शिक्षकांसाठीही एक झाड लावण्यात आले
स्नेह मेळाव्यातील चर्चा संदर्भात विद्यार्थ्यांनी शाळेतल्या गमती जमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला व एकमेकांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
शाळेतल्या खोल्या व खोल्यातील बाकडी आणि शेजारी बसणारे मित्र मैत्रिणी यांची आठवण प्रत्येकाच्या मनात घर करून असते शाळा सोडल्यानंतर पुन्हा वर्गात बसण्याची इच्छा वारंवार मनात येत असते, म्हणून अशा स्नेह मेळाव्याचे आयोजन प्रत्येक वर्षी करावे अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली,
काही मित्र व मैत्रिणी दूरचा प्रवास करून या मेळाव्यास उपस्थित राहिले होते
उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तहसीलदार, ए पी आय, डॉक्टर इंजिनीयर, शिक्षक, वकील, पोलीस, तलाठी,उद्योजक इत्यादी पदावर कार्यरत आहेत
शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधले.
सर्वच शिक्षकांनी या बॅच संदर्भात बोलताना अतिशय समाधान आणि आनंद व्यक्त केला. शाळेची मदत करण्याचा सामाजिक उपक्रमाचा आदर्श जो या विद्यार्थ्यांच्या बॅचने घडवून आणलेला आहे याचा मनापासून अभिमान वाटतो असे सांगितले
स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या सर्व मित्र मैत्रिणींचे फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

सुप्रिया काळे, नीता शिंदे, अबोली माने, मोनिका कांबळे, निलेश बागाव, व्यंकटेश शिंदे, अभिषेक गायकवाड, निलेश जेधे, सुजय कांबळे, सोमनाथ लोंढे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
शाळेल्स भेट म्हणून १२ सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले
भारतीय संविधानाचे ७५ वे वर्ष म्हणजेच भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने अमोल खरात यांचे वतीने संविधान उद्देशिका भेट देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संदीप जाधव, निलेश कांबळे, चंद्रकांत इंदलकर, कैलास गावडे, अमित जरांडे, प्रवीण पवार, अभिजीत निगडे, अभिषेक गायकवाड, गणेश गायकवाड, महेश रंदावणे, अंबादास गावडे, चंद्रकांत यादव, विनोद डोंबाळे, अण्णा काळे ,जमीर इनामदार यांनी प्रयत्न केले
स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन रेश्मा शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तबरेज सय्यद यांनी केले तर रूपाली बारवकर यांनी आभार मानले.
अशी माहिती शाळेचे माजी विध्यार्थी अमोल खरात यांनी दिली.






