
बारामती : बारामतीचे वरिष्ठ आगारप्रमुख श्री घोगरे साहेब व वाहतूक पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेब यांना दिनांक 01/03/2025 रोजी..बारामती बस स्थानकामध्ये महिलांसाठी हिरकणी कक्ष चालू करावा, तसेच खाजगी ट्रॅव्हल वाल्यांचा लोकांना होणारा त्रास, व जो स्वारगेट बस स्थानकावर अनुचित प्रकार घडला तो पुन्हा इतर कोठे घडू नये .या करिता सुरक्षा बंदोबस्त वाढवणे
⚫कॉलेजच्या तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळे च्या एक ते दीड तास अगोदर व नंतर सेपरेट फक्त विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा करणे…
⚫बऱ्याच ठिकाणी बस थांबत नाहीत त्या ठिकाणी बस थांबे करण्याची मागणी केली..
⚫दिशादर्शक बोर्ड तसेच हेल्पलाइन नंबर हिरकणी खोलीला हिरकणी बोर्ड लावने बाबत..
⚫महिला सिक्युरिटी मध्ये वाढ. व शौचालय स्वच्छता…बाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी बारामती ता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्ष वनिता बनकर’ ,शहराध्यक्ष आरती शेंडगे, यांच्यासह अमित तावरे,जयकुमार काळे,अस्लम तांबोळी ,वृषाली बांदल,राणी नवले,नितीन तावरे, मनोज केंगार,राजेश जाधव, विठ्ठल करे, अजिंक्य वाघमोडे, चारुदत्त काळे,शहाजी जाधव,मनिषा ताई, रेश्मा शेंडगे,सुनीता झेंडे,स्मिता साबळे, माया खुंटे,वर्षा शिंदे, कल्पना परदेशी ,रेश्मा शेंडगे, प्रियंका गव्हाळे, उषा शिंदे, भरते ताई, सुप्रिया शेंडगे,खाडे ताई.ममता जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते..