बारामतीः बारामती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध उभा असणाऱ्या उमेदवाराला ज्यादाची मत कधीच मिळवीता आले नाही. सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीला भाजपचा उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध उभा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती सोबत सत्तेत सहभागी झाला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडी सोबत आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत ननंद विरुद्ध भावजय अशी लढाई सर्वांनी पाहिली आहे. तसेच आता बारामती विधानसभेला देखील काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होणार आहे.
युगेंद्र पवार करीत असलेल्या कामाची बारामती तालुक्यात सध्या चर्चा आहे. नागरिकांनी युगेंद्र पवार यांच्यासमोर प्रश्न मांडल्यानंतर सदर प्रश्न तात्काळ मार्गी लागत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांना भेटण्यासाठी भिगवण चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या कार्यालयात उपस्थित राहून जनतेचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचे काम युगेंद्र पवार करीत असल्यामुळे बारामती विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होणार आहे.






