बारामती : बारामती शहरात जन सन्मान यात्रेनिमित्त स्वागत कमानी आणि बॅनर ठीक ठिकाणी लागले आहेत.या बॅनर आणि स्वागत कमानीला बारामती नगर परिषदेने परवानगी दिली असेल तर यामधून मोठ्या प्रमाणावर नगर परिषदेला कर मिळणार आहे.
बॅनर परवानगी दिल्यानंतर नगर परिषदेचा एक बारकोड(स्कॅनर) मिळतो आणि बॅनर वरती छापावा लागतो.असा बारकोड( स्कॅनर) बॅनर वर दिसले नाही.वाहतुकीच्या ठिकाणी बॅनर लावताना बारामती नगर परिषद आणि वाहतूक पोलीस यांनी कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही.त्यामुळे या बॅनर मुळे जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण? उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालक मंत्री अजित पवार यांनी उत्साही कार्यकर्ते यांना सूचना दिल्या पाहिजेत की जाहिरात करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या.असे नागरिकांमधून बोलले जात आहे
ज्या लोकांनी बॅनर लावताना परवानगी घेतली नसेल त्यांच्यावर शहर विद्रूपीकरणाचा गुन्हा दाखल होणार का? बारामती नगरपरिषद कारवाई करणार का?
व्यापारी,दुकानदार यांना जाहिरातीसाठी कमान आणि बॅनर लावायचे असतील तर बारामती नगर परिषद त्यांच्याकडून योग्य शुल्क आकारते.मग राजकीय बॅनर लावताना देखील कर आकाराला पाहिजे.सर्वांसाठी एकच नियम पाहिजे.






